गोल पोस्ट महाराष्ट्र रत्नागिरीत जमावबंदी लागू

रत्नागिरीत जमावबंदी लागू

रत्नागिरी: कोरोणाचा प्रादुर्भाव पूर्ण देशात दिसून येत आहे. प्रत्येक राज्याचे सरकार या साठी उपाय योजना करतं आहे. भारतात ११० पेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. या मुळे अनेक ठिकाणी जमाव बंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यामध्ये जमाव बंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात येणार होता. याचबरोबर याआधी मुंबईमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईत ३ आणि नवी मुंबई एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३७ वर गेली आहे.

आज रत्नागिरी मध्ये सुद्धा जमाव बंदीचा आदेश देण्यात आला आहे. काहीवेळा पूर्वी ही बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी जमावबंदी आदेश जारी केलेला आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही खबरदारी घेतली जाते त्याची महत्त्वाची गोष्ट अशी की पाच पेक्षा जास्त व्यक्तीच्या एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीमध्ये संशयित रुग्ण आढळून आल्याचे बोलले जात होते. अशा अफवा जोर धरू लागल्या होत्या. यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे. जमाबंदी लावणे हे प्रतिबंधात्मक पाऊल असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

error: Content is protected !!
Exit mobile version