मुंबई, २८ ऑक्टोबर २०२२ : शिंदे गटातून आता नवनवीन प्रकरणे बाहेर येत आहे. असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. आज बच्चू कडू मुंबईत दाखल झाले आहेत. ते तातडीने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता बच्चू कडू यांचं प्रकरण जास्त पेटलं आहे, असं म्हणावं लागेल.
शिंदे गटाच्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिंदे-गटाला अजून टोमणे ऐकावे लागत आहेत. त्यामुळे या विस्तारात बच्चू कडूंना स्थान मिळणार की नाही, हा प्रश्न अजूनही तसाच आहे. याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू मुंबईत नक्कीच मुख्यमंत्र्यांना भेटून या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावतील असे वाटते. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी माध्यमांना सांगितले की, राणांच्या आरोपांमुळे फडणवीस अडचणीत येत आहेत. तसेच रवी राणांना अक्कल असती तर ते असे बोललेच नसते. रवी राणा म्हणजे सरकार नाही. चुकीचे आरोप करुन रवी राणा प्रसिद्धी मिळवत आहेत. सततच्या खोट्या आरोपांमुळे मी आवाज उठवला असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले. आता शिंदे आणि फडणवीस यांनी समोर येऊन बोललं पाहिजे. माझ्या अस्तित्वाचा प्रश्न होता, असे म्हणत बच्चू कडूंनी आपले म्हणणे मांडले. हा प्रश्न लवकरच तडीस नेणार असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
पण सध्या या वादावर रवि राणांनी एकच वक्तव्य केले की, दिवाळीत अनेक फटाके वाजले. पण त्यातला एक फटाका हा नक्कीच फुसका होता. असं म्हणत त्यांनी काणाडोळा केला असं म्हणावे लागेल. रवी राणांच्या आरोपानंतर बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केले. रवी राणा आता यावर काय पाऊल उचलणार हे हे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.
मात्र बच्चू कडू लवकरच नक्की काय जाहीर करणार? हे मात्र त्या दिवशी समजेल. मग हा बार फुसका आहे की खणखणीत नाणं, हे समजायला आता एक नोव्हेंबर ही तारीख उजडावी लागणार, हे मात्र खरं…
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस