रविचंद्रन अश्विनच्या धमाकेदार खेळीने राजस्थान रॉयल्स विजयी, पॉइंट टेबलमध्ये दुसरे स्थान

CSK vs RR, 21 मे 2022: शुक्रवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यात राजस्थान रॉयल्सने (आरआर) चेन्नई सुपर किंग्जचा पाच गडी राखून पराभव केला. राजस्थान रॉयल्सने 151 धावांचे लक्ष्य दोन चेंडू राखून पूर्ण केले. या शानदार विजयासह राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत आपले दुसरे स्थान निश्चित केले.

राजस्थान रॉयल्सचा डाव (151/5)

लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली आणि 12 धावांवर जोस बटलरची विकेट गमावली. यानंतर यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांनी 51 धावांची भर घालून डाव सांभाळला. सॅमसनने 15 धावांची खेळी खेळली, तर जैस्वालने 44 चेंडूंत 59 धावांची खेळी खेळली, ज्यात 8 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. अखेरच्या षटकात आर. अश्विनने 23 चेंडूत नाबाद 40 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

पहिली विकेट: जोस बटलर 2 धावा (16/1)
दुसरी विकेट: संजू सॅमसन 15 धावा (67/2)
तिसरी विकेट: देवदत्त पडिककल 3 धावा (76/3)
चौथी विकेट: यशस्वी जैस्वाल 59 धावा (104/4)
पाचवी विकेट: शिमरॉन हेटमायर 6 धावा (112/5)

चेन्नई सुपर किंग्जचा डाव (150/6)

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना CSK ने 20 षटकांत 6 बाद 150 धावा केल्या. इंग्लिश फलंदाज मोईन अलीने 57 चेंडूंत 13 चौकार आणि तीन षटकारांसह 93 धावांचे योगदान दिले. मोईन अलीच्या आयपीएल कारकिर्दीतील ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. याशिवाय कर्णधार एमएस धोनीने 26 धावांची खेळी खेळली. राजस्थान रॉयल्सकडून युझवेंद्र चहल आणि ओबेद मॅकॉय यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

पहिली विकेट – ऋतुराज गायकवाड 2 धावा, (2/1)
दुसरी विकेट – डेव्हन कॉनवे 16 धावा (85/2)
तिसरी विकेट – एन. जगदीसन, 1 धाव, (88/3)
चौथी विकेट – अंबाती रायुडू 3 धावा, (95/4)
पाचवी विकेट – एमएस धोनी 26 धावा (146/5)
सहावी विकेट- मोईन अली 93 धावा (146/6)

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (सी/डब्ल्यू), देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रणंद कृष्णा, युझवेंद्र चहल, ओबेद मॅककॉय.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, अंबाती रायडू, एन जगदीसन, एमएस धोनी (c/w), मिचेल सँटनर, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग, मथिशा पाथिराना, मुकेश चौधरी.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा