मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी रवींद्र कुलकर्णी यांची तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ सुरेश गोसावी यांची नियुक्ती

मुंबई, ७ जून २०२३ : पुणे आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू पद मागील काही महिन्यांपासून रिक्त होते. मागील काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या आणि त्याआधी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी कुलगुरू निवड समितीने मुलाखती घेतल्या होत्या. यातील पाच नावे राज्यपालांकडे पाठवली होती. त्यामुळे कुलगुरुपद कोणाला मिळणार याकडे लक्ष लागले होते. अखेर राज्यपालांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी रवींद्र कुलकर्णी यांची, तर डॉ सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ सुरेश गोसावी यांची नियुक्ती केली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी प्रा. रवींद्र कुलकर्णी – मुंबई विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू म्हणून यांनी काम केले आहे, सुरेश गोसावी – भौतिक शास्त्राचे प्राध्यापक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तेज प्रताप सिंग – बीएचयु ( बनारस हिंदू विद्यापीठ), राज्यशास्त्राचे प्राध्यापक, ज्योती जाधव – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट, अर्चना शर्मा – भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर ही नवे चर्चेत होती.

तर पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी डॉ. पराग काळकर – सावित्रीबाई फुले पुणे, विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता, प्रा. अविनाश कुंभार – विद्यापीठातील रसायनशास्त्र विभाग, डॉ.संजय ढोले – भौतिकशास्त्र विभाग, प्रा. सुरेश गोसावी – पर्यावरण शास्त्र विभाग, डॉ. विजय फुलारी – कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभाग ही नवे चर्चेत होती. यावर अखेर राज्यपाल महोदयांनी शिक्कामोर्तब करून मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी रवींद्र कुलकर्णी यांची तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ सुरेश गोसावी यांची नियुक्ती केली आहे. या निवडीमुळे विद्यापीठातील विद्यार्थी आणि विद्यापीठातील प्राध्यापक कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत. त्याचबरोबर इतर सोयीसुविधा आणि विद्यापीठाची कार्यप्रणाली सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा