गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा ‘तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी’ पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला

‘तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी’ पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई, ९ जानेवारी २०२३ : रोमिओ आणि जुलिएट ही जोडी तर जगप्रसिद्ध आहेच; पण जग्गू आणि जुलिएट ही नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने उत्कृष्ट अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी मराठी प्रेक्षकांसाठी एक चित्रपट घेऊन आले आहेत. प्रेमाच्या दिवशी प्रेमाची एक अनोखी कहाणी उलगडणार आहे.

काही दिवसांपूर्वीच अमेय वाघने नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले. येत्या १० फेब्रुवारीला त्याचा ‘जग्गू आणि जुलिएट’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर आता तरण आदर्श या चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाचा टिझरही त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केला आहे.

अमेय वाघच्या शब्दांत बोलायचं झालं तर ‘तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी’ प्रेक्षकांना पाहता येणार आहे. अजय आणि अतुल या प्रसिद्ध जोडीने या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले आहे. असा हा संपूर्ण एंटरटेनमेंट पॅकेज असलेला पुनित बालन स्टुडिओ निर्मित, महेश लिमये दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘जग्गू आणि ज्युलिएट’ ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने १० फेब्रुवारी २०२३ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे.

error: Content is protected !!
Exit mobile version