पुणे, ११ ऑगस्ट २०२३ : रयत शिक्षण संस्थेतील सेवकांनी सुरू केलेली अर्थवाहिनीने सेवकांबरोबर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.रयत बँकेतर्फे विद्यार्थिनींना सवलतीत सायकलिंचे वाटप करण्यात आले. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः सायकल वापरून पर्यावरण संतुलन राखा, असा संदेश दिला पाहिजे. विद्यार्थ्यांना ५०% सवलतीमध्ये सायकली देऊन रयत बँकेने स्तुत्य उपक्रम राबविला आहे, असे वक्तव्य चं.बा.तुपे साधना कन्या विद्यालयाच्या प्राचार्या सुजाता कालेकर यांनी केले.
बेटी बचाव बेटी पढाव या योजनेअंतर्गत शासन स्तरावर अनेक वर्षापासून मुलींच्या शिक्षणासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. परंतु शासनाबरोबरच सेवाभावी संस्था आणि इतर संस्था, संघटनांनी आपले दायित्व म्हणून मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेऊन काम करतायत ही उल्लेखनीय बाब आहे. राज्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मुलींच्या शिक्षणासाठी वेगवेगळे उपक्रम राबवल्याचे निदर्शनास येते. आता हाच ओघ शहराच्या दिशेने पाहायला मिळत आहे.
रयत शिक्षण संस्थेतील सेवकांच्या रयत बँकेच्या वतीने, विद्यार्थींनींना पन्नास टक्के सवलतीमध्ये विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षक नितीन सोनवणे, छाया पवार, मंदाकिनी शिंदे, बँकेचे व्यवस्थापक राक्षे, विद्यार्थी-पालक आणि शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष डॉ.शंतनु जगदाळे, प्राचार्या सुजाता कालेकर, उपप्राचार्य विठ्ठल तुळजापूरे, रयत बँकेचे संचालक अशोक कोलते, आजीव सभासद लालासाहेब खलाटे, रमेश उंडे, सचिन आढळराव यांच्या हस्ते सायकलचे वाटप करण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर