आरबीआय खरेदी करणार २०,००० कोटी रुपयांचे सरकारी बाँड

नवी दिल्ली, १० फेब्रुवरी २०२१: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) २०,००० कोटी रुपयांचे सरकारी रोखे (बाँड) खरेदी करण्याची घोषणा केली आहे. बुधवारी ओपन मार्केट ऑपरेशन अंतर्गत हा बाँड खरेदी करतील. केंद्रीय बँकेने सोमवारी याची घोषणा केली. यानंतर, बाँड यील्ड ५ बेस पॉइंटने घटले.

बाँड यील्ड आणि त्याची (बॉन्ड) किंमत यांच्यात एक विपरीत संबंध आहे. बाँडची किंमत जसजशी वाढते तसतसे त्याचे यील्ड कमी होते. बाँडची किंमत कमी झाल्यामुळे यील्ड वाढते. बाँडचे यील्ड काही काळ सातत्याने वाढत राहिले होते.

केंद्रीय बँकेने म्हटले आहे की, “सध्याच्या तरलता आणि आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर रिझर्व्ह बँकेने ओपन मार्केट ऑपरेशन (ओएमओ) अंतर्गत सरकारी सिक्युरिटीज खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. १० फेब्रुवारी रोजी एकूण २०,००० कोटी रुपयांचे बाँड खरेदी केले जाणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा