आरबीआयच्या रेपो दर कपातीने रिअल इस्टेट क्षेत्राला गती – रोहित गेरा

15

८ फेब्रुवारी २०२५ मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पाच वर्षांनंतर प्रथमच रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात करून तो ६.२५% करण्याचा निर्णय घेतला आहे. गेरा डेव्हलपमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक रोहित गेरा यांनी याबाबत माहिती दिली. तसेच या निर्णयाचे स्वागत करताना ते म्हटले की, “या दरकपातीमुळे गृहकर्जाचे व्याजदर कमी होतील, परिणामी घर खरेदी अधिक परवडणारी होईल आणि त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला मोठी चालना मिळेल.”

गेल्या काही वर्षांत स्थिरावलेल्या रिअल इस्टेट क्षेत्रासाठी ही सकारात्मक बातमी असून, विशेषतः मध्यमवर्गीय व परवडणाऱ्या गृहनिर्माण क्षेत्रात मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, या निर्णयाचा खरा फायदा ग्राहकांना मिळण्यासाठी बँकांनी लवकरात लवकर गृहकर्ज व्याजदर कपात करणे गरजेचे आहे, असेही गेरा यांनी सांगितली.

आरबीआयच्या निर्णयासोबतच, केंद्र सरकारने अलीकडील अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा देणारी धोरणे जाहीर केली आहेत. त्यामुळे ‘सर्वांसाठी घर’ या सरकारी योजनेलाही चालना मिळेल आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा