आरसीबी संघाने बलाढ्य चेन्नई सुपर किंग्स संघांवर केली ३७ धावांनी मात

दुबई, ११ ऑक्टोबर २०२०: आयपीएल २०२० मध्ये झालेल्या २५ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने बलाढ्य अश्या चेन्नई सुपर किंग्स संघाला ३७ धावांनी पराभूत केले आहे. २०२० मधील चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रदर्शन हे इतर सिजन्स पेक्षा निराशाजनक आहे. याआधी कोणत्याही सिजन मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाने इतकी निराशाजनक कामगिरी नाही केली.

सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करतांना बँगलोर संघाने २० षटक अखेर ४ बाद १६९ धावा केल्या. यात नुकताच फॉर्ममध्ये आलेला बँगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली याने ५२ चेंडूत नाबाद ९० धावा केल्या. तसेच देवदत्त पदिकाल याने ३४ चेंडूत ३३ तर ऑल राऊंडर शिवम दुबे याने १४ चेंडूत नाबाद २२ धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्स संघाकडून गोलंदाजी करतांना शार्दुल ठाकूर याला २ विकेट्स तर दीपक चहर आणि सम करण याला १ विकेट मिळाला.

१७० धावांचा पाठलाग करताना चेन्नई संघाचा सलामीच्या फलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली नाही. शेन वॉटसन अवघ्या १४ धावात तर डू प्लेसी ने ८ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या अंबाती रायुडू आणि जगदीशन याने सामना सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु ते ही अपयशी ठरले. रायुडू ने ४० चेंडूत ४२ धावा तसेच जगदीशन याने ३३ धावा केल्या. कर्णधार महेंद्रसिंह धोनीला अजूनही फॉर्म गवसलेला दिसून येत नाही आहे. फक्त १० धावा करत तो पवेलियन मध्ये परतला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाकडून गोलंदाजी करतांना क्रिस मॉरिस याला ३ विकेट्स, वॉशिंग्टन सुंदर याला २ तसेच युजवेन्द्र चहल आणि उदाना यांना प्रत्येकी एक एक विकेट्स मिळाल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा