इंडियाना, 6 जुलै 2022: अमेरिकेत सलग दुसऱ्या दिवशी गोळीबाराची घटना समोर आली आहे. इंडियाना गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी 10 जणांना गोळ्या घातल्या. ही घटना ब्रेनियाना येथील गॅरीची आहे. येथे ब्लॉक पार्टीत ही घटना घडली.
अमेरिकेत गोळीबार काही नवीन नाही. एक दिवस आधी सोमवारी शिकागोमध्ये स्वातंत्र्यदिनी झालेल्या गोळीबाराने सर्वांनाच धक्का दिला होता. फ्रीडम परेडमधून बाहेर पडत असताना अचानक गोळीबार झाला. परेडमध्ये गोळीबार झाल्यानंतर गोंधळ उडाला. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर 24 जण जखमी झाले आहेत. हल्लेखोराने छतावरून गोळ्या झाडल्या होत्या. हल्लेखोराला पकडण्यात आले. त्याचं वय 22 वर्षे होते.
रॉबर्ट “बॉबी” ई क्रिमो असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर सुमारे दोन तासांनी पोलिसांनी त्याला पकडले. पोलिसांनी आरोपीचा फोटोही जारी केला आहे. तो उंचीने अगदी लहान आहे. त्याचे लांब केस आहेत आणि त्याने शरीरावर अनेक टॅटू बनवले आहेत. हल्ल्याच्या दिवशी त्याने पांढऱ्या-निळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता. याआधी नुकतेच येथील एका शाळेत झालेल्या गोळीबारात अनेक मुलांसह 21 जणांचा मृत्यू झाला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे