मुंबई, ९ सप्टेंबर २०२०: अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. यातच मंगळवारी एनसीबीने बॉलिवूड अभिनेत्री आणि सुशांत सिंग राजपूत याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अटक केली आहे. अटकेनंतर शेखर सुमन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर ‘जे पेराल तेच उगवेल’ असं शेखर सुमन यांनी म्हटलं आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर शेखर सुमन यांनी त्याला न्याय मिळवून देण्यासाठी मोहीम देखील सुरु केली होती. “हे खरंच खूप मोठं यश आहे. त्याच्याकडे नेहमी प्रत्येकाला न्याय मिळतो. न्यायासाठी तुम्ही उठवलेला आवाज आणि मेहनतीचं खऱ्या अर्थाने सार्थक झालं आहे. तुम्ही जे पेराल तेच उगवेल.” असे शेखर सुमन यांनी ट्विट करून म्हंटले आहे.
याआधी रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा याला अटक झाल्यानंतर शेखर सुमन यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. ‘छोटा मासा गळाला लागला आहे, आता वेळ मोठ्या माशाची आहे,’ अशा आशयाचं शेखर सुमन यांनी ट्विट केलं होतं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे











































