शिवजयंती निमित्त सिल्लोडमध्ये महाराजांच्या इतिहासाचे वाचन

सिल्लोड, २० फेब्रुवारी २०२४ : शिवरायांची जयंतीला स्टेटसला फोटो ठेवून महाराजांचा इतिहास तरुणांना समजणार नाही तर अखंड भारताचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी महाराजांचे विचार वाचून आत्मसात केल्यास आदर्श समाज निर्माण होऊन सर्वच क्षेत्रात सामाजिक परिवर्तन होईल असे प्रतिपादन प्रा. अनिल साबळे यांनी केले आहे.

मातोश्री गयाबाई साबळे प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ग्रंथालयाच्या वतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेगवेगळ्या ग्रंथाचे वाचनाचे काल आयोजन करण्यात आले होते. ग्रंथालयाच्या वतीने सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत ७८ युवकांनी तसेच वाचकांनी शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नाचून नव्हे तर वाचून साजरी केली.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस गणेश अर्बन बँकेचे व्यवस्थापक भगवान राऊत, संचालक प्रा. अनिल साबळे, गजानन आव्हाड, ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. सचिन साबळे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला मीनाताई राऊत, शिल्पा आव्हाड, स्नेहल साबळे, अंजली साबळे, ग्रंथपाल राधा यगड, सुनिता पवार यांच्या सह अनेक वाचकांची उपस्थिती होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : डॉ. सचिन साबळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा