रिलायन्सला थेट आव्हान देण्याची तयारी! आता अदानी समूहाने या व्यवसायात केला प्रवेश

नवी दिल्ली, ३ ऑगस्ट २०२१: अदानी ग्रुप आता देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला आव्हान देण्याच्या तयारीत आहे. अदानी समूह आता पेट्रोकेमिकल व्यवसायात प्रवेश करतोय. यासाठी समूहाने अदानी पेट्रोकेमिकल्सची स्थापना केलीय. अदानी पेट्रोकेमिकल्स रिफायनरीज, पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स, स्पेशॅलिटी केमिकल युनिट्स, हायड्रोजन आणि त्याच्याशी निगडीत इतर अनेक रासायनिक प्लांट ची स्थापना करणार आहेत.

गौतम अदानी यांनी गेल्या वर्षी म्हटलं होतं की, अदानी ग्रीन एनर्जीने अनुसूचीच्या चार वर्ष अगोदर २५ गीगावॉट अक्षय ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य गाठलं आहे. अदानी ग्रीनने यासाठी २०२०-२१ चं लक्ष्य ठेवलं होतं.

कंपनी स्थापन केली

हे लक्षात घेण्यासारखं आहे की, अदानी ग्रुप बंदर, विमानतळ, वीज, गॅस वितरण अशा अनेक प्रकारच्या व्यवसायात आहे. आता हा ग्रुप पेट्रोकेमिकल व्यवसायात उतरण्याची तयारी करत आहे. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायजेसने जाहीर केले आहे की त्यांनी ३० जुलै रोजी अदानी पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (APL) ची संपूर्ण मालकीची कंपनी स्थापन केली आहे. ही कंपनी रजिस्ट्रार ऑफ कंपनीज गुजरातमध्ये नोंदणीकृत आहे.

रिलायन्सची मक्तेदारी

विशेष म्हणजे देशातील पेट्रोकेमिकल व्यवसायावर सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) चं वर्चस्व आहे. जूनमध्ये होणाऱ्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी घोषणा केली होती की, कंपनी पुढील तीन वर्षात या व्यवसायात ७५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. कंपनीने गुजरातच्या जामनगरमध्ये ५,००० एकरवर धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्सचं बांधकाम सुरू केलंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा