नवी दिल्ली, दि. २५ मे २०२०: स्थलांतरित मजुरांसाठी सुरू करण्यात आलेल्या श्रमिक विशेष गाड्यांवर अद्यापही राजकीय रस्सीखेच चालूच आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ठाकरे सरकारवर एक टीका करणारे ट्विट केले आहे.
पीयूष गोयल म्हणाले की उद्या आम्ही महाराष्ट्रात १२५ विशेष ट्रेन देण्यास तयार आहोत. त्यांच्याकडे कामगारांची यादी तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणून कृपया अशी विहित माहिती पाठवावी. अशी आम्ही विनंती केली आहे की ट्रेन कोठे धावेल, ट्रेन नुसार प्रवाशांची यादी, त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि ट्रेन कोठे जाणार आहे याची पुढील एक तासात ही माहिती मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पाठवा, जेणेकरुन आम्ही रेल्वे गाड्या सोडून वेळेवर योजना करू शकू.
पियुष गोयल यांनी टोमणा मारत असे म्हटले आहे की, आशा आहे की पूर्वीप्रमाणेच यावेळेसही ट्रेन स्टेशनवर येऊन रिकाम्याच धावणार नाहीत. ठाकरे सरकारला जेवढ्या रेल्वेगाड्यांची गरज आहे तेवढ्या पुरवल्या जातील. टीव्हीवर पाहिल्याप्रमाणे असे समजते की महाराष्ट्र सरकारने २०० रेल्वे गाड्यांसाठी ची यादी केंद्र सरकारकडे पाठवली आहे. परंतू वास्तविक पाहता रेल्वेकडे अध्याप कोणतीही यादी प्राप्त झालेली नाही त्यामुळे महाराष्ट्र सरकारने कृपया यादी पाठवावी.
भारतीय रेल्वेने २३ मे पर्यंत २८०० मजुरांसाठी विशेष गाड्या चालवल्या असून त्यामध्ये सुमारे ३७ लाख प्रवाश्यांनी प्रवास केला. या विशेष गाड्यांच्या फेऱ्या पाहिल्या तर एकूण ८० टक्के बिहार आणि उत्तर प्रदेशात निश्चित करण्यात आल्या आहे. वेगवेगळ्या राज्यातून लाखो लोक बिहार आणि उत्तर प्रदेशात पोहोचले. यामुळे बिहार आणि यूपीच्या मार्गांवर रेल्वेगाड्यांचा व्यस्त प्रवास दिसून आला.
न्यूज अनकट प्रतिनिधी