नेपाळ मधे उभारणार खरी अयोध्या, गौतम बुद्ध ही नेपाळी…..

काठमांडू, ११ ऑगस्ट २०२०: नेपाळ हा भारतावर रोज काही ना काही वक्तव्य करत आहे.त्यात नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी मध्यतंरी भारतात असलेली अयोध्या ही बनावटी असून प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी होते असं वक्तव्य ओली यांनी १३ जुलै रोजी देशाला संबोधित करताना केलेल्या भाषणात केलं होतं. तर आता ओली हे नेपाळमधे रामाचे भव्य मंदिर उभारणार आसल्याची माहिती समोर आली आहे.तसेच त्यांनी या राम मंदिर मुद्यावर पुन्हा एकदा भारतावर निशाणा साधला आहे.

ओली यांनी भारतावर साधलेले निशाणे…...

ओली यांनी सांस्कृतिक अतिक्रमणासाठी भारताने बनावट अयोध्या निर्माण केल्याचा दावा केला होता.“राजपुत्र असलेल्या रामाला आम्ही सीता दिली असं आम्ही आजही मानतो. मात्र आम्ही भारतात असलेल्या अयोध्येच्या राजकुमाराला सीता दिली नाही.अयोध्या नावाचं गाव बीरगंजच्या पश्चिमेला आहे.मात्र भारतात असलेली अयोध्या खरीखुरी नाही”असाही दावा ओली यांनी केला होता.

भारतातली अयोध्या हि खरी असेल तर तिथला राजकुमार लग्नासाठी जनकपूरला येऊच कसा शकतो ?”असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच विज्ञान, ज्ञानाची उत्पत्ती आणि विकास नेपाळमध्ये झाल्याचाही ते बोलले. नेपाळ सरकारची वृत्तसंस्था असणाऱ्या राष्ट्रीय समाचार समितीने दिलेल्या माहितीनुसार ओली यांनी फोन करुन ठोरी आणि माडी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींना काठमांडूमध्ये बैठकीसाठी आमंत्रित केलं आहे. देशाची राजधानी असणाऱ्या काठमांडूमध्ये सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेतल्यानंतर भव्य राम मंदिर बांधण्यासाठी सर्व आवश्यक तयारी करण्याचे निर्देश ओलींनी दिले आहेत.

गौतम बुद्ध ही नेपाळी….

जागतिक पातळीवर स्वत:चे हसे करुन घेण्याची सवयच जणू नेपाळच्या पंतप्रधान के पी ओली यांना लागली वाटत आहे. त्यातच आता त्यांनी विश्वाला शांततेचा मार्ग दाखवणारे गौतम बुद्ध यांच्या विषयी एक वक्तव्य केले आहे. गौतम बुद्ध हे भारतीय नसून नेपाळी असल्याचा दावा आता ओली यांनी केला आहे.

ओली हे सध्या भारताबद्द्ल सारखे गरळ जरी बरळत असले तरी त्यांचे भारतात मात्र चांगलेच ट्रोल केले जात आहे. तसेच आता नेटकरी त्यांना “भारत ही नेपाळच आहे”असे दावा करतील की म्हणून त्यांच्यावर ताशेरे ओढले जात आहे. त्यात पंतप्रधानच्या या वागणुकीमुळे नेपाळमधील जनतेमधे त्यांच्या बद्दल संताप व्यक्त होताना दिसत आहे. तर नेपाळाच्या पंतप्रधान ओली यांच्या या निर्णयाला आणि दाव्याला भारत सरकार कसे उत्तर देईल हे पाहणं रंजक ठरेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा