गोल पोस्ट क्रीडा रियल माद्रिद संघ अंतिम फेरीत

रियल माद्रिद संघ अंतिम फेरीत

नवी दिल्ली : ‘स्पॅनिश सुपर कप’ या फुटबॉल स्पर्धेत रियल माद्रिद संघाने वेलेंसियाचा ३-१ ने पराभव करत अंतिम फेरीत दाखल झाला आहे.
रियल माद्रिद संघाकडून टोनी क्रूजने १५ व्या मिनिटाला आणि इस्कोने ३९ व्या मिनिटाला केलेला गोल सामन्याच्या उत्तरार्धात लुका मोदरिचने ६५ व्या मिनिटाला गोल करत ३-० अशी आघाडी मिळवली. त्यानंतर अतिरिक्त वेळेत वेलेंसियाकडून डेनियल पेरेजो याने एकमेव गोल केला.
रियल माद्रिदने १६ व्यांदा स्पॅनिश सुपर कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून २०१७ साली बार्सिलोना हरवत विजेतेपद पटकावले होते.
दरम्यान, स्पॅनिश सुपर कप स्पर्धेतील दुसरी सेमीफाइनल बार्सिलोना आणि एटलेटिको माद्रिद यांच्यात होणार आहे. यात जिंकणाऱ्या संघासोबत रियल माद्रिदचा अंतिम सामना रविवारी रंगणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version