Realme C25Y भारतात १६ सप्टेंबरला होणार लॉन्च, किंमत असू शकते १० हजारांपेक्षा कमी

पुणे, १६ सप्टेंबर २०२१ : Realme C25Y भारतात गुरुवार १६ सप्टेंबर रोजी लॉन्च होईल. Realme ने एक प्रसिद्धी पत्र पाठवून ही माहिती दिली आहे. सध्या कंपनीने या आगामी स्मार्टफोनबद्दल फारशी माहिती दिलेली नाही. त्याची काही वैशिष्ट्ये आतापर्यंत सांगितली गेली आहेत. Realme C25Y अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्ट वर उपलब्ध करून दिले जाईल.

कंपनीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे की Realme C25Y भारतात १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता लाँच होईल. हा नवीन स्मार्टफोन अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवर लाँच केला जाईल.

मात्र, आगामी फोनची किंमत दोन्ही ठिकाणी नमूद केलेली नाही. समोर आलेल्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर फोनची किंमत १०,००० रुपयांच्या आत ठेवली जाऊ शकते.

Realme C25Y ची वैशिष्ट्ये

प्रेस रिलीझनुसार, हा स्मार्टफोन Unisoc T610 प्रोसेसरसह येईल. तसेच, यात 50MP AI प्राथमिक कॅमेरा आणि मोठी बॅटरी मिळेल. सध्या या स्मार्टफोनबद्दल फारशी माहिती देण्यात आलेली नाही.

मात्र, Realmeने शेअर केलेला फोटो पाहता यावरून हे समजले जाऊ शकते की Realme C25Y वॉटरड्रॉप स्टाईल नॉचसह येईल. त्याच वेळी, डिस्प्लेमध्ये तीन बाजूंनी बेझल दिसतील. तथापि, चिन बऱ्यापैकी जाड असेल. सिम ट्रे स्मार्टफोनच्या उजव्या बाजूला असेल.

या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. त्याचबरोबर मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सरही दिसेल. Realme C मालिकेत, हा आगामी फोन Realme C25s आणि Realme C25 नंतर तिसरा फोन असेल. दोन्ही ९,९९९ रुपयांच्या आत लाँच करण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा