Realme GT २ भारतात लॉन्च, ५०MP कॅमेरा, अफोर्डेबल फ्लॅगशिप फोन

पुणे, २३ एप्रिल २०२२ : रियलमीने आपला नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केलाय, जो एक फ्लॅगशिप डिव्हाइस आहे. काही काळापूर्वी कंपनीने Realme GT २ Pro लॉन्च केला होता आणि आता कंपनीने त्याचं व्हॅनिला व्हर्जन Realme GT 2 लॉन्च केलंय. दोन्ही स्मार्टफोन्स डिझाईनच्या बाबतीत सारखेच आहेत, तर त्याची वैशिष्ट्ये वेगळी आहेत.

क्वालकॉम स्नॅपड्रॅगन (Qualcomm Snapdragon) 888 प्रोसेसर, बायोपॉलिमर डिझाइन आणि इतर फीचर्स GT २ मध्ये उपलब्ध आहेत. कंपनीने मागील वर्षी लॉन्च झालेल्या Realme GT ५G चा सक्सेसर म्हणून हा फोन लॉन्च केलाय. या रियलमी स्मार्टफोनची किंमत आणि इतर फीचर्स जाणून घेऊया.

Realme GT २ ची भारतात किंमत

ब्रँडने हा फोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केलाय. Realme GT २ च्या ८GB रॅम आणि १२८GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ३४,९९९/- रुपये आहे, तर १२GB रॅम आणि २५६GB स्टोरेज व्हेरिएंट ३८,९९९/- रुपयांना उपलब्ध असेल. हा फोन पेपर ग्रिन, पेपर व्हाइट आणि स्टील ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध असेल.

सुरुवातीच्या सेलमध्ये कंपनीला या फोनवर HDFC बँक कार्ड्सवर ५०००/- रुपयांची सूट मिळत आहे. यानंतर तुम्ही हा फोन अनुक्रमे २९,९९९/- आणि ३३,९९९/- रुपयांना खरेदी करू शकता. त्याची पहिली विक्री २८ एप्रिल रोजी होणार आहे.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स?

Realme GT २ ला ६.६२-इंच AMOLED स्क्रीन मिळते, जी फुल HD + रिझोल्यूशन आणि १२०Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येते. डिस्प्लेच्या संरक्षणासाठी गोरिल्ला ग्लास ५ देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरवर काम करतो.

यात १२GB पर्यंत RAM आणि २५६GB पर्यंत स्टोरेज आहे. यामध्ये मेमरी कार्ड सपोर्ट मिळणार नाही. Realme चा हा फोन Android १२ वर आधारित Realme UI ३.० वर काम करतो. यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्याची मुख्य लेन्स ५०MP आहे.

याशिवाय तुम्हाला आणखी दोन सेन्सर मिळतात. फ्रंटमध्ये कंपनीने १६MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी, ५०००mAh बॅटरी दिली आहे, जी ६५W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये वायरलेस चार्जिंगला सपोर्ट नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा