120Hz AMOLED डिस्प्लेसह Realme GT Neo 2 लॉन्च, गेमिंगसाठी खास

पुणे, 24 सप्टेंबर 2021: Realme GT Neo 2 लाँच करण्यात आलाय. या नवीन गेमिंग फोकस्ड फोनमध्ये 120Hz AMOLED डिस्प्ले आणि ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर आहे. त्याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यासोबतच स्टीरियो स्पीकर्स आणि 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

Realme GT Neo 2 ची किंमत चीनमध्ये 8GB + 128GB व्हेरिएंटसाठी CNY 2,499 (अंदाजे 28,500 रुपये), 8GB + 256GB व्हेरिएंटसाठी CNY 2,699 (अंदाजे 30,800 रुपये) आणि टॉप 12GB + 256GB व्हेरिएंट साठी CNY 2,999 (अंदाजे 34,200 रुपये) आहे लावली आहे.

हा फोन ग्रीन, पील ब्लू आणि शॅडो ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. Realme GT Neo 2 लवकरच जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीनं दिलीय.

Realme GT Neo 2 ची वैशिष्ट्ये

ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित Realme UI 2.0 वर चालतो आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 6.62-इंच सॅमसंग E4 डिस्प्ले आहे. यासह, डिस्प्लेमध्ये 1,300 निट्स पीक ब्राइटनेस, HDR10 + सपोर्ट आणि 600Hz टच सॅम्पलिंग रेट देखील देण्यात आले आहेत.

या स्मार्टफोनमध्ये 12GB रॅमसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर आहे. Realme GT Neo 2 मध्ये 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज देण्यात आले आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, यात 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth, GPS / A-GPS, NFC आणि USB Type-C पोर्टचा सपोर्ट आहे.

Realme GT Neo 2 मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनच्या मागील बाजूस 64 एमपी प्राइमरी कॅमेरा, 8 एमपी अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2 एमपी मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. यात 5,000mAh ची बॅटरी 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा