बंडखोर सत्यजीत तांबेंची काँग्रेसकडून हकालपट्टी

मुंबई, १९ जानेवारी २०२३ : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून पदवीधर मतदार संघाच्या विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणुकीची बिगुल वाजल्यापासून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलेच वातावरण तापलेले पाहायला मिळाले आहे. त्यातच नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांनी पक्षाचा आदेश झुगारून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

– नाशिकमध्ये शुभांगी पाटील यांना पाठींबा

दरम्यान, आज महाविकास आघाडीने नाशिकमध्ये शुभांगी पाटील आणि नागपूरमध्ये सुधाकर आडबालेंना पाठिंबा देत असल्याचे निश्चित झाले असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. तसेच पक्षाने तांबे यांच्यावर कारवाई करत त्यांचे निलंबन केले असल्याचेही पटोले यांनी यावेळी सांगितले. महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठक आज पार पडली, त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भूमिका मांडली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा