‘सन्मान माणुसकीचा’ योजनेअंतर्गत एलबीजीटीक्यू समुहातील व्यक्तींचा सत्कार

पुणे, १६ डिसेंबर २०२०: आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘सन्मान माणुसकीचा’ हे अभिनव अभियान संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात आलं. याअंतर्गत खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र युवती संघटक सोनाली अजित गाडे-पाटील यांनी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं.

यामध्ये एलबीजीटीक्यू+ समूहाच्या रिशिका शर्मा, मुन्नी कुंवर, सारिका कुंवर, सलमा कुंवर, माही कुंवर, मुस्कान कुंवर यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सन्मानपत्र, ट्रॉफी व साडी देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला विधानसभा अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, खडकवासला ग्रामीण अध्यक्ष त्रिंबक आण्णा मोकाशी, पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेवक युवराज बेलदरे, नगरसेविका स्मिता कोंढरे, भावना पाटील, मृणालिनी ताई वाणी, शरद दबडे पाटील, स्नेहल शिगारे, मनाली भिलारे, गीतांजली सारगे, तेजवती कपाले, शर्मीली गरवारे, रोहिणी खडसे बारामती तालुका सरचिटणीस, श्वेता खरात, स्मिता जोशी, सीमा , मंजू चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा