गोल पोस्ट महाराष्ट्र राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना भारतरत्न साठी शिफारस करा...

राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना भारतरत्न साठी शिफारस करा : मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लातूर दि.१० सप्टेंबर २०२० :राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना भारतरत्न साठी शिफारस करा, अशी मागणी आमदार बाबासाहेब पाटील यांनी आज पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली .

अहमदपूर राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे संस्कृतीक कार्यामध्ये मोलाचे योगदान असून, वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळवून महाराजांनी धर्माचरण व आणि ज्वलंत राष्ट्रवादाला वाहून घेतले होते.

विद्वत्ता आणि अमोल वाणी यामुळे समाजाने त्यांना राष्ट्रसंत म्हणून मानाचे स्थान दिले. त्यांनी धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवण्यासाठी सातत्य पूर्ण प्रयत्न प्रयत्न केले. त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य उभे केले होते तसेच त्यांची भूमिका महत्वपूर्ण होते.

तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात जन्मलेल्या भारत मातेच्या या महान पुत्रास सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार प्रधान करण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या शासनाच्या वतीने केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात यावी अशी विनंती चाकुर अहमदपुर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड

error: Content is protected !!
Exit mobile version