गोल पोस्ट समाजकारण वसुली अधिकारी शेख यांचा सत्कार

वसुली अधिकारी शेख यांचा सत्कार

माळेगाव, २६ ऑक्टोबर २०२०: माळेगाव गाळा लिलावात जास्तीचे आलेले ५० हजार रुपये ग्रामपंचायत माळेगावच्या वसुली अधिकारी रेश्मा शेख यांनी प्रामाणिकपणे परत केल्याने शेख यांचा माळेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

माळेगाव ग्रामपंचायतीने घेतलेल्या गाळा लिलावात भाग घेण्यासाठी घाईघाईत आलेल्या दत्तात्रय तावरे यांनी ५० हजार रुपये भरायचे असताना त्यांनी गडबडीत १ लाख रुपये भरले. ही बाब वसुली अधिकारी असणाऱ्या रेश्मा शेख यांच्या लक्षात आल्यावर .त्यांनी घडलेला हा प्रकार ग्रामपंचायत सदस्य प्रशांत मोरे यांना सांगितला. मोरे यांनी दत्तात्रय तावरे यांना संपर्क साधून त्यांचे जास्तीचे आलेले ५० हजार रुपये त्यांना परत देण्यात आले.

रेश्मा शेख यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सरपंच जयदीप तावरे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी उपसरपंच अजित तांबोळी, जयदीप तावरे, अनिल लोणकर, राजाभाऊ खरात, धर्मराज पैठणकर इ. मान्यवर उपस्थित होते. माळेगाव परिसरात रेश्मा शेख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

error: Content is protected !!
Exit mobile version