

पुणे, दि. १४ मे २०२०: कोविड १९ च्या संकटामुळे सर्वत्र आरोग्य संबंधी आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता पुणे महानगरपालिकेने तातडीच्या अस्थायी स्वरूपातील जागा भरती करण्यासाठी आदेश काढले आहेत. विविध पदांसाठी या आदेशानुसार अर्ज मागवण्यात आले आहे. राज्यात मुंबईनंतर सर्वात जास्त कोविड १९ प्रकरणे पुण्यामध्ये आहेत त्यामुळे ठराविक मर्यादा करता ही पदे भरण्यात येणार आहेत.
सदर पदांचा कालावधी हा सहा महिन्यांसाठी राहणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. www.punecorporation.org ह्या संकेत स्थळावर सदर पदांविषयी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या पदांमध्ये मध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, ज्युनियर नर्स, परिचारिका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक व इतर पदांचा समावेश आहे. सदर पदांसाठी अर्ज करण्याची तारीख ११ मे पासून ते १८ मे पर्यंत तर असणार आहे. ही सर्व पदे अस्थायी स्वरूपाची असल्यामुळे ठराविक काळापर्यंतच याची मर्यादा असणार आहे. हा कालावधी सहा महिन्यांचा ठरविण्यात आला आहे त्यानंतर सदर जागेसाठी कोणताही हक्क उमेदवारास दाखवता येणार नाही. सदर कामाचा कालावधी आठ तासाचा असणार आहे ज्यामध्ये रुग्णसेवेचे किंवा आरोग्य संबंधित इतर कामे दिले जाईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी
Where to submit documents