पुणे, दि.३ मे २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा केंद्र सरकारकडून कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच राज्यातील लॉकडाऊनबाबत महाराष्ट्र शासनाने काही मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत. मुंबई , पुणे , पिंपरी-चिंचवड, मालेगाव या परिसरात कोरोनाचे अधिक कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्याने या सर्व शहरांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, मालेगाव परिसरातील कार्यालये , दारुचे दुकाने , ४ मे पासून उघडता येणार नाहीत, अशी घोषणा महाराष्ट्र शासनाने केली आहे.
त्यामुळे या चारही शहरातील सर्व खाजगी आणि सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रातील झोन्सची यादी जाहीर झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला असून महाराष्ट्रात १४ जिल्हे रेड झोनमध्ये, १६ ऑरेंज तर ६ ग्रीन झोनमध्ये गेले आहेत.
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, मालेगावमध्ये कोरोनाचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे या चारही शहरांचा समावेश रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या तत्वानुसार, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये खाजगी आणि सरकारी कार्यालये सुरु करता येणार आहेत. तसेच दारुचे दुकाने आणि इतर दुकानेही उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
राज्यात ज्या शहरांचा ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये समावेश आहे, अशा ठिकाणी असलेले खाजगी अथवा सरकारी कार्यालयात ३३ टक्क्यांहून अधिक कर्मचारी उपस्थित राहू शकत नाहीत. तसेच सरकारी आणि खाजगी कार्यालयात कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी सेतू ऍप इंस्टॉल करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील नागरिकांना आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या सोशल डिस्टिंगच्या नियमाचे पालन करावे लागणार आहे.अशी माहिती केंद्रीय मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर