50MP प्राइमरी कॅमेरासह Redmi 10 लॉन्च, किंमत अंदाजे १३,३०० रुपये

मलेशिया, २० ऑगस्ट २०२१: बुधवारी मलेशियामध्ये रेडमी १० लाँच करण्यात आला. हा स्मार्टफोन लवकरच इतर बाजारात उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. या स्मार्टफोनमध्ये 50MP प्रायमरी सेन्सरसह क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. तसेच, यात मीडियाटेक हेलिओ G88 प्रोसेसर आणि 5,000mAh ची बॅटरी आहे.

शाओमीने आपल्या अधिकृत ब्लॉगद्वारे रेडमी १० ची घोषणा केली आहे. तथापि, ब्लॉग पोस्ट फोन कुठे उपलब्ध असेल हे सांगत नाही. पण, शाओमी मलेशियाने ट्विटमध्ये नमूद केले आहे की रेडमी १० मलेशियात उपलब्ध असेल. सध्या, भारतात लॉन्च करण्याबाबत माहिती प्राप्त झालेली नाही.

ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, फोनच्या 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत $ १७९ (अंदाजे १३,३०० रुपये), 4GB + 128GB व्हेरिएंटची किंमत $ १९९ (अंदाजे १४,८०० रुपये) आणि 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत $ २१९ (अंदाजे १६,३०० रुपये) आहे. रेडमी १० कार्बन ग्रे, पेबल व्हाइट आणि सी ब्लू कलर ऑप्शन्समध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ब्लॉगमध्ये लॉन्च मार्केट्सबद्दल कोणतीही माहिती नाही, परंतु उपलब्धता २० ऑगस्ट रोजी लिहिलेली आहे.

मलेशिया पहिल्या लॉन्च मार्केटपैकी एक असू शकते. तेथे कंपनीच्या ट्विटर हँडलवरून फोनच्या उपलब्धतेविषयी माहिती देण्यात आली आहे. फोनच्या 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत MYR६४९ (अंदाजे ११,४०० रुपये) आणि 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत MYR ७४९ (अंदाजे १३,१०० रुपये) असेल असे सांगितले गेले आहे.

रेडमी १० ची वैशिष्ट्ये

हा फोन अँड्रॉइड ११ आधारित MIUI १२.५ वर चालतो आणि ६.५-इंच फुल-एचडी + (१०८०x२४०० पिक्सेल) 90Hz रिफ्रेश रेटसह अॅडॅप्टिवसिंक डिस्प्ले आहे. या फोनमध्ये MediaTek Helio G88 प्रोसेसर आहे ज्यामध्ये 6GB रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज आहे. Redmi 10 ची बॅटरी 5,000mAh आहे आणि 18W फास्ट चार्जिंग आणि 9W रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट आहे.

फोटोग्राफीसाठी, त्याच्या मागील बाजूस क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा ५०MP आहे. तसेच, ८ एमपी अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, २ एमपी मॅक्रो कॅमेरा आणि २ एमपी डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी समोर ८ एमपी कॅमेरा आहे. यात ३.५ मिमी हेडफोन जॅक आणि ड्युअल स्पीकर्स देखील आहेत. या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर साइड माऊंटेड आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा