रेडमी नोट ९ प्रो, नोट ९ प्रो मॅक्स भारतात लॉन्च

मुंबईः शाओमीनं भारतात आपला रेडमी नोट ९ सीरिज लॉन्च केला. रेडमी ८ लाइनअप सारखा, यावेळी कंपनीनं तीन डिव्हाईस लॉन्च केले. ज्यात रेडमी नोट९ प्रो मॅक्स (Redmi Note 9 Pro Max),रेडमी नोट ९ (Redmi Note 9) आणि रेडमी नोट ९ प्रो (Redmi Note 9 Pro) समावेश आहे.

शाओमी इंडियाचे मुख्य मार्केटिंग अधिकारी अनुज शर्मानं यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, रेडमी नोट प्रो सीरिज एमआय फॅन्ससाठी बनवण्यात आला आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की या फोनच्या आउरा डिझाइन, प्रो कॅमेरा आणि मॅक्स परफॉर्मेन्सचं नक्की कौतुक करतील.

रेडमी नोट ९ प्रो मॅक्सची ही आहेत वैशिष्ट्ये

तीन स्टोरेज व्हेरिएंट लॉन्च केला आहे.

हा स्मार्टफोन ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले

तीन कलर व्हेरिएंट- इंटरस्टेलर ब्लॅक, आउरा ब्ल्यू आणि ग्लेसियर व्हाइट

फोन ६ जीबी- ६४ जीबी, ६ जीबी- १२८ जीबी आणि ८ जीबी-१२८ जीबी व्हेरिएंटमध्ये मिळेल.

स्क्रीन रिज्योल्यूशन २४०० x १०८० पिक्सल आहे.

ट्रिपल कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ नं लेस आहे.

एड्रेनो ६१८ जीपीयू सुद्धा आहे.

रेडमी नोट ९ प्रो मॅक्समध्ये क्वॉड कॅमेरा सेटिंग

६४ एमपी प्रायमरी लेस, ८ एमपी अल्ट्रा वाइड एंगल लेंस

५ एमबी मायक्रो सेंसर आणि २ एमपी डेप्थ सेंसर

फ्रंटमध्ये यात ३२ एमपी इन डिस्प्ले सेल्फी शूटर

अत्याधुनिक क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर आहे.

या व्हेरिएंटची किंमत १४,९९९, १६,९९९ आणि १८,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.

हा फोन मी डॉट कॉम, अॅमेझॉन इंडिया, मी होम्स आणि मी स्टूडिओजमध्ये २५ मार्चपासून उपलब्ध होईल.

रेडमी नोट ९ प्रोचे फिचर

दोन स्टोरेज व्हेरिएंट लॉन्च केलेत.

हा स्मार्टफोन ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले

इंटरस्टेलर ब्लॅक, आउरा ब्ल्यू आणि ग्लेसियर व्हाइटमध्ये उपलब्ध होईल.

हा फोन ४ जीबी-६४ जीबी, ६जीबी-१२८ जीबी व्हेरिएंटमध्ये मिळेल.

स्क्रीन रिज्योल्यूशन २४००X१०८० पिक्सल आहे.

ट्रिपल कॉर्निग गोरिल्ला ग्लास ५ लेस आहे.

एड्रेनो ६१८ जीपीयू

क्वॉड- कॅमेरा सेटिंग

४८ एमपी प्रायमरी लेंस, ८ एमपी अल्ट्रा वाइड एंगल लेंस

5एमबी मायक्रो सेंसर आणि २MP डेप्थ सेंसर

फ्रंटमध्ये यात सुद्धा ३२ MP इन डिस्प्ले सेल्फी शूटर

अत्याधुनिक क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर आहे.

याची किंमत १२,९९९ आणि १५,९९९ रुपये असेल.

याची विक्री मी डॉट कॉम, अॅमेझॉन इंडिया, मी होम्स आणि मी स्टूडिओजमध्ये १७ पासून सुरु होईल.

दोन्ही स्मार्टफोन लवकरच सर्व ऑफलाइन पार्टनर स्टोर्सवर उपलब्ध होतील. दोन्ही स्मार्टफोन अॅन्ड्रॉईड १० वर एमआययूआय ११ च्या मदतीनं चालतील. दोन्ही फोनमध्ये ५०२० एमएएचची बॅटरी आहे आणि मॅक्स ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येईल. तर नोट ९ प्रोसोबत १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा