शेतकरी विरोधी कायदे रद्द करून पेट्रोल-डीझेलचे दर कमी करा

माढा ८ फेब्रुवरी २०२१ : पेट्रोल-डीझेलसह घरगुती गॅसची दरवाढ कमी करून शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग माढा तालुक्याच्या वतीने तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे सदर निवेदनाची प्रत नायब तहसीलदार पतंगे कुर्डुवाडी यांना देण्यात आली आहे.
सद्या दिल्ली मधे शेतकऱ्यांकडून शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्यात यावा यासाठी हजारो शेतकरी ठान मांडून बसले आहेत तरी देखील केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही व शेतकऱ्यांना चर्चा करण्यात वेळ घालवते पण कायदे रद्द करत नाही. तसेच पेट्रोल व डिजेलने व गँस महागाईने जनता त्रस्त झाली आहे. यासर्वावर लवकर तोडगा काढला जावा यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा चिटणीस संतोष सरवदे माढा तालुकाध्यक्ष अमोल कांबळे उपाध्यक्ष सचिन आयरे चिटणीस अक्षय कांबळे सदस्य नारायण पवार बंडू जाधव सोमनाथ कांबळे स्वप्निल शिंदे यासह राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक व न्याय विभागाचे कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा