मुंबई, १६ एप्रिल २०२३: महाराष्ट्राला शनिवारी कोरोनापासून दिलासा मिळाला आहे. १५ एप्रिल रोजी राज्यात कोरोनाचे केवळ ६६० नवीन रुग्ण आढळून आले आणि २ रुग्णांचा मृत्यू झाला. शुक्रवारी कोरोनाचे ११५२ नवीन रुग्ण आढळून आले असून ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सलग तीन दिवस कोरोनाबाधितांचा आकडा हजाराचा आकडा पार करत होता ही दिलासादायक बाब आहे. मात्र मुंबईत कोरोनाचा वेग कमी झालेला नाही.
महाराष्ट्रात कोरोनाचा वेग मंदावला असला तरी दिल्ली, मुंबईसारख्या महानगरांमध्ये मात्र कोरोनाने आपला वेग कायम ठेवला आहे. शनिवारी दिल्लीत १३९६ नवीन रुग्ण आढळले. कोरोना पॉझिटिव्हिटीचा दरही ३१.९ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. तसेच ५ रुग्णांचा मृत्यू झाला.
शनिवारीही नवीन कोरोना रुग्णांची संख्या २५० च्या पुढे गेली. आज मुंबईत कोरोनाचे २६६ नवीन रुग्ण आढळले आहेत. यापैकी १३ रुग्णांना रुग्णालयात दाखल केले असून २०७ जण कोरोनाने बरे झाले आहेत. यात कोणाचा मृत्यू झाला नाही ही दिलासादायक बाब आहे. सध्या मुंबईत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १७०२ आहे. ७ एप्रिलपासून मुंबईत कोरोनाचे २५९ हून अधिक रुग्ण सातत्याने समोर येत आहेत. केवळ १० एप्रिल रोजी ९५ प्रकरणे समोर आली.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड