माढ्यात आज नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

माढा, २८ जुलै २०२०: माढा तालुक्यातील मुद्रांक खात्यातील कर्मचाऱ्यांचे आज लेखणी बंद आंदोलन करण्यात आले आहे. हे आंदोलन एक दिवसाचे म्हणजेच २८ जुलै रोजी करण्यात आले आहे. अशी माहिती नोंदणी मुद्रांक संघटनेचे कार्याध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या राजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून १५ विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र शासनाकडे दिले आहे. त्यामध्ये संवर्गातील रिक्त असलेली पदे भरण्यात यावीत, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत देण्यात यावी, मुंबई विभागातील मुद्रांक विभागातील रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात यावीत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटूबियांना ५० लाख रूपयांची मदत द्यावी या मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे.

याअगोदर निवेदन देऊनही शासन दखल घेत नसून संघटनेच्या माध्यमातून लेखणी बंद आंदोलन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातून दस्त करण्यासाठी आलेल्या लोकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले आहे. एकतर नोंदणी व मुद्रांक विभाग ऑनलाइन केल्यामुळे ग्रामीण भागात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत तीन ते चार दिवसांत दस्त नोंदणी होण्यासाठी लागतात. त्यात हे काम बंद आंदोलन यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा