पुण्यात नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार

पुणे शहरात 11 जुलै 2022 नंतरही दैनंदिन पाणीपुरवठा होणार असून 26 जुलैपर्यंत पाणीपुरवठा दैनंदिन स्वरूपातच होणार आहे. सध्याची धरणांतील पाणी पातळी ध्यानात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर 26 जुलैच्या साठ्याचा आढावा घेऊन पुढील नियोजन जाहीर केले जाईल.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पात पाणी साठा संपत आला होता. पुढील परिस्थितीचा विचार करत महानगरपालिकेने पुण्यामध्ये 4 जुलै रोजी पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. ही पाणी कपात 11 जुलै पर्यंत नियोजित करण्यात आली होती. मात्र यानंतर पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सध्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. धरणातील सध्या स्थिती पाहता 26 तारखेपर्यंत महानगरपालिकेने पाणीपुरवठा नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या टेमघर धरणामध्ये (7 जुलै च्या आकडेवारी नुसार) 4.3% पाणीसाठा उपलब्ध आहे, जो मागील वर्षी याच वेळी 16.8% होता. 10 जुलै च्या आकडेवारीनुसार पवना धरणामध्ये 23.56% पाणीसाठा उपलब्ध आहे. खडकवासला धरणात 63.08% पाणीसाठा उपलब्ध आहे. तर वरसगाव धरणात 24.89% पाणीसाठा उपलब्ध आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा