रेखा चा बंगला केला सील, सुरक्षा रक्षक होता कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई, दि. १२ जुलै २०२०: बॉलिवूड अभिनेत्री रेखाच्या वांद्रे येथील बंगल्याचा काही भाग सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी रेखाच्या बंगल्याच्या एका सुरक्षारक्षकाला कोविड -१९ ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर रेखा चा बंगला पूर्णपणे सिल न करण्याच्या बातम्या समोर येत होत्या. पण आता मुंबई महानगरपालिकेने रेखाच्या बंगल्याचा कंपाउंड वॉचमेन चा स्टाफ जेथे राहत होता तो भाग सिल करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेखा चा बंगला सील करण्यासाठी चा निर्देशक देखील मुंबई महानगर पालिकेने बंगल्याबाहेर लावला आहे. रेखाच्या सुरक्षा रक्षकाला कोरोना व्हायरसच्या उपचारांसाठी कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. इतर कर्मचार्‍यांच्या परीक्षेचे निकाल अजून येणे बाकी आहेत. रेखा मुंबईच्या वांद्रे येथील बॅंडस्टँड भागात स्थित ‘सी स्प्रिंग्स’ नावाच्या तिच्या बंगल्यात राहते. तिच्या बंगल्यावर नेहमीच दोन सुरक्षा कर्मचारी तैनात असतात, त्यातील एक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. वांद्रे येथील कोरोना सेंटरवर त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबई महानगर पालिका अधिकाऱ्यांनी रेखाच्या बंगल्याच्या बाहेर नोटिस लावली असून त्यास कंटेन्ट झोन असे वर्णन केले आहे. रेखाच्या बंगल्यात निर्जंतुकीकरण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

रेखा पहिला सेलिब्रेटी नाही ज्यांच्या घरातील कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. त्यांच्या अगोदर, जानव्ही कपूर, आमिर खान, करण जोहर आणि इतर सेलिब्रेटीचे कर्मचारीही कोरोनाने संसर्गित असल्याचे आढळले. याशिवाय शनिवारी रात्री अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा