रेखाटन

होय,तो आता काही काळ आपल्या सोबतच राहणार आहे.म्हणून त्याच्याशी “मैत्री”केलेलीच बरी.अर्थात त्याला कसे हँडल करायचे हे सुद्धा महत्वाचे.म्हणजे मास्क वापरणे,काही अंतर ठेउन समाजात वावरणे,वारंवार हात स्वछ करणे ह्या गोष्टी संभाळून आपण त्याच्याशी “मैत्री”करु शकतो. आणि “तो”आपला मित्र ह्याकरता की ह्या कोरोना ने आपल्या मानवजातीला,समाजाला खुप काही अगदी ३/४ महिन्यात शिकवले.जसे की निसर्ग आणि प्राणी,पक्ष्यांना जपावे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवावी, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये,स्वत:चे आरोग्य जपावे,वैयक्तिक स्वच्छता जपावी.ह्या गोष्टी कोरोनाने आपल्याला काटेकोरपणे शिकवल्या म्हणून आता तो आपला “मित्र”. “अल्पकाळा” करिता मित्र!

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा