शाळा उघडणार….जुलैमध्ये वर्ग भरणार!!
अरेच्चा,शालेय शिक्षण विभाग काय डोक्यावर पडलयं का? खरतर “विद्या परमं दैवतम”च! पण…पण ह्या अश्या महामारीच्या काळात प्रयोग करुन पहायला “शाळकरी मुलं”काय माकडं आहेत की उंदरं? प्रयोगच करायचे आहेत ना मग आधी सगळी सरकारी कार्यालये,लोकसभा,विधानसभा,मंत्रालय,मॉल इत्यादी हे सगळं उघडा,तिथे संसर्ग वाढतो का ते बघा.आणि मग “शाळां”वर “शाळा” करा.एक लक्षात ठेवा,ही आजची शाळकरी मुलं देशाचे उद्याचे भविष्य आहे.त्यांना जपायला हवे.६/७ महिने शाळेत गेले नाही तर काही नुकसान होणार नाही.पुर्वी नाही का नापास होऊन २/२ वर्ष त्याच इयत्तेत बसवायचे? त्या पिढीचे काही नुकसान झाले का?अहो,केस पांढरे झालेल्यांना अजून हा “कोरोना”नीट समजला नाही.लहान मुलांना कधी समजणार?आणि विषय फी चा,शिक्षकांच्या पगाराचाच असेल तर किमान ६ महिन्याची “नाममात्र गुरुदक्षिणा”आपण जरुर घ्यावी. त्यासाठी उगाच मुलांच्या जीवानिशी खेळ नको.सरतेशेवटी काय तर सरकारने, शिक्षण मंडळाने आपली सद्विवेक बुद्धी जागृत ठेवावी,नाहितर येणारी ही पिढी “शिक्षणाच्या आईचा घो”म्हंटल्या शिवाय राहणार नाही.उभे एकसाथ नमस्ते…!!!