ऑनलाइन शाळा सुरु होऊन आठवडा झाला असेल…एकुणच शाळांची ही “गंमत”पाहता..एक प्रश्न निर्माण झाला आहे की,”ऑनलाइन शाळा कोणाची? मुलांची की पालकांची? कारण साधारणतः आपल्याकडे शाळकरी मुलांकडे त्यांचा स्वत: चा मोबाइल नसतो,तेव्हा अर्थातच सद्ध्या पालकांना शाळेच्या वेळेत सर्व काम बाजुंला ठेउन घरी बसावे लागत आहे.(मोबाइल किमान ४G चाच हवा,हा भाग वेगळा)तो नसेल तर तो आत्ता घ्यावाच लागणार.बर,त्यात बहुतेक पालकांना २ आपत्य असतात आणि दोघेजण एकाच शाळेत असतात…त्यांनी काय २/२ मोबाईल उपलब्ध करायचे का?आधीच गेल्या ३ महिन्यापासून कोरोना लॉकडाउन मुळे “आर्थिक गणित”बिघडले आहे…!! त्यात हे “ऑनलाइन शाळे”चे महागडे “चोचले” सर्वसामान्य मध्यमवर्गीयां परवाड़तील का हो????