रेखाटन

“भूमिपूजन” जरुर व्हावे अगदी, “न भूतो न भविष्यती”असे व्हावे….!! कारण त्यामागे नुसत्या हिंदूस्तानातील हिंदूंच्याच नव्हे तर साऱ्या पृथ्वीवरच्या हिंदूंची अस्मिता एकवटली आहे.

पण हे असे “आनंदसोहळे” देश एका गंभीर, ऐतेहासिक अश्या संकटात सापडलेला असताना करणे खरच योग्य आहे का????

विचार करा, आपल्या घरात जर दुखवटा असेल तर आपण अश्या सुतकात “सोहळे-सभारंभ” साजरे करतो का??? आणि जर हे योग्य वाटत असेल तर आपल्याला त्या “मर्कजवाल्या तबलीगींना” नावं ठेवण्याचा काही एक अधिकार नाहिये…!!

एकदाची ती “लस” खुल्या बाजारात येऊ द्या…! देशातल्या प्रत्येक नागरिकाला ती लस “टोचू” द्या (तुमचे ते १५ लाख नकोत,पण लस फुकटात टोचा) देशात “हार्ड-इम्युनिटी”तयार होऊ द्या..आणि मग…”देव मस्तकी धरावा…अवघा हलकल्ल्लोळ करावा”…!!!! बोलो सियाप्रभू रामचंद्र की जय…!!! बोलो हनुमान की जय..!!!!

error: Content is protected !!
Exit mobile version