महाराष्ट्र दिनी उद्धव ठाकरेंनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

मुंबई, १ मे २०२०: आज (१ मे) दुपारी १ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संपर्क साधला. यावेळेस त्यांनी जनतेला महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच आपल्या जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला. याच बरोबर एक मे कामगार दिन असल्याने त्याच्याही शुभेच्छा त्यांनी जनतेला केल्या.

महाराष्ट्र दिनानिमित्त बोलताना ते म्हणाले की, ‘मुख्यमंत्री म्हणून हुतात्म्यांना वंदन करताना मनात आलेल्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ठाकरे घराण्याचाही सहभाग होता. हिरक महोत्सवी महाराष्ट्र दिन धुमधडाक्यात साजरा करण्याचे आधी ठरवलं होतं, पण आता नाईलाज आहे. आजही मी तोंडावर मास्क लावून अभिवादन केल. लतादीदींनी २०१० मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी बीकेसीतील मैदानात ‘बहु असोत सुंदर’ गाण गायल्याची आठवण जागी झाली.

कोरोना विषयी बोलताना ते म्हणाले की, ‘त्यावेळेस आपण रक्त दान शिबिर घेतले होते आणि त्याचा विश्व विक्रम देखील झाला होता. आज त्याच जागी कोविड रुग्णांसाठी उपचार केंद्र आपण उभे केले आहे आणि रुग्णांसाठी ऋग्ण शैय्या उपलब्ध करून दिल्या आहेत.’

मुंबईतील गर्दीची ठिकाणे आणि झोपडपट्ट्यांमध्ये ऑक्सिमीटरच्या मदतीने दोन लाख तपासण्या करण्यात आल्या आहे. यामध्ये त्यांचा रक्त दाब, ऑक्सिजनची पातळी इत्यादी गोष्टी तपासण्यात आल्या. २७२ जणांमध्ये ऑक्सिजन मात्रा कमी किंवा इतर व्याधी असलेले सापडले असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंगोलीमध्ये पोलीस जवानांना कोरोनाची लागण झाली आहे, पण सर्व जणांवर विलगीकरण कक्षात उपचार चालू आहेत. अद्यापही ७५ ते ८० टक्के रुग्ण सौम्य, अतिसौम्य लक्षणं असलेले आहेत. काळजी घेतली नाही तर ते कोरोनाचे वाहक ठरण्याची भीती आहे. त्यामुळे लक्षण नसले तरी त्यांना अलग ठेवण्यात आले आहे.

बीकेसीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी आली आहे. इतकेच नव्हे तर मुंबई आणि कल्याण डोंबिवलीच्या महापौरांनी पुन्हा परिचारिका म्हणून काम करण्याची तयारी दाखवली आहे. त्याच बरोबर कोरोना योद्धा मोहिमेमुळे वीस हजार कोविड योद्धे तयार आहेत त्यापैकी दहा हजार योद्ध्यांना प्रशिक्षण देत आहोत.

२ लाखांहून अधिक कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ७५ -८० टक्के रुग्णांत सौम्य लक्षणं आहेत. मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये तपासणी सुरू करण्यात आली आहे. या चाचणी दरम्यान इतर आजार असलेल्यांची विशेष खबरदारी घेतली जात आहे. फिव्हर क्लिनिकमध्ये वेळेमध्ये या तसेच लक्षण दिसलं तर अंगावर काढू नका अशी सूचना देखील उद्धव ठाकरेंनी दिली.

कोरोना झाला म्हणजे सगळं संपलं असं नाही, ६ महिन्यांच्या बाळापासून आजीबाईंपर्यंत अनेकजण बरे झाले आहेत. रेड झोनमध्ये कडक नियम पाळावे लागतील. तीन तारखेनंतर प्रत्येक झोनमध्ये मोकळीक देऊ, मात्र घाई-गडबड करू नका, अन्यथा सर्व तपश्चर्या वाया जाईल. पोलिस, डॉक्टर देवासारखे लढत आहेत त्यांचे कष्ट वाया जाईल असे कृत्य करू नका अशी ताकीद देखील त्यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा