मुंबई, दि. २३ जून २०२० : रिलायन्स इंडस्ट्रीजची (आरजीआय) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) १५ जुलै रोजी होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे किंवा अन्य ऑडिओ-व्हिडिओ माध्यमातून ही बैठक होईल. सोमवारी कंपनीने ही माहिती दिली. मार्केट कॅपिटलायझेशन (एम-कॅप) च्या आधारे आरआयएल ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे.
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि सेबीचे परिपत्रक लक्षात घेऊन कंपनी आपला ४३ वा एजीएम आयोजित करणार असल्याचे आरआयएलने स्टॉक एक्सचेंजला सांगितले आहे. गेल्या काही महिन्यांत रिलायन्सच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. याचे कारण कंपनीने हळूहळू स्वच:ला कर्जातून मुक्त केले आहे.
मंगळवारी आरआयएलच्या समभागांमध्ये काही प्रमाणात घट दिसून आली. दुपारी १२ वाजता कंपनीचा शेअर १.१३ टक्क्यांनी घसरून १७२६ रुपयांवर गेला होता. सोमवारी कंपनीचा शेअर १८०४ रुपयांच्या पातळीला गेला. आजपर्यंतच्या शेअरची ही सर्वोच्च किंमत आहे.
१५० अब्ज डॉलर्सचे मूल्यांकन करणारी आरआयएल ही देशातील पहिली कंपनी बनली आहे. हे मूल्य ११ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. आरआयएल जगातील सर्वाधिक वैल्यूएशन असलेल्या ऊर्जा कंपन्यांपैकी एक आहे. तिची मार्केट कॅप टोटल एसए, रॉयल डच शेल आणि बीपीपेक्षा जास्त आहे. तथापि, रिलायन्सचे वैल्यूएशन कॅप एक्सॉन मोबिल, शेवरॉन आणि सौदी अरामकोपेक्षा कमी आहे. सौदी अरामको ही सौदी अरेबियाची तेल कंपनी आहे. ही जगातील सर्वात जास्त वैल्यूएशन असलेली ऊर्जा कंपनी आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी