रिलायन्सने अरब देशांना दिला मोठा धक्का, केली रशियाशी हातमिळवणी

नवी दिल्ली, 14 जून 2022: युक्रेनबरोबरच्या युद्धानंतर आपले कच्चे तेल जागतिक दरापेक्षा कमी दराने विकण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून भारतीय रिफायनिंग कंपन्या तेलाच्या आयातीसाठी रशियाकडं वळल्या आहेत. पण रशियाकडून कच्च्या तेलाची आयात महागल्याने भारताच्या रिफायनरींना फारसा फायदा झाला नाही. तथापि, एप्रिलमध्ये प्रथमच भारताच्या एकूण तेल आयातीमध्ये रशियाच्या कच्च्या तेलाचा वाटा 5 टक्के होता. आता रिलायन्स इंडस्ट्रीजने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी केल्याची बातमी आहे.

रिलायन्सने आयात वाढवली

मे महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी पाचवा भाग रशियामधून आला होता. व्यापार आकडेवारीनुसार, युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले होते. यानंतर रशियाने जागतिक दरापेक्षा कमी दराने कच्चं तेल आयात करण्यास सुरुवात केली. डेटा दर्शविते की रिलायन्सने मे महिन्यात दररोज सुमारे 1.4 दशलक्ष बॅरल तेल आयात केलं, जे एप्रिलच्या तुलनेत 9.1 टक्क्यांनी वाढलं आहे.

मध्यपूर्वेतील आयात कमी झाली

रिलायन्सने मध्य पूर्वेतून आयात कमी केली आणि एप्रिलमध्ये ती 67 टक्क्यांवरून 61 टक्क्यांवर घसरली. त्याच वेळी, रशियन नेतृत्वाखालील C.I.S. देशांमधून कच्च्या तेलाची निर्यात 13 टक्क्यांवरून 23 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. डेटावरून असं दिसून आलंय की खाजगी रिफायनरीज मे महिन्यात सलग दुसऱ्या महिन्यात यूएस तेल आयातीपासून दूर राहिल्या.

रशिया विकत आहे कमी किमतीत तेल

अहवालानुसार, रशिया सध्या जागतिक दरापेक्षा 35 टक्के कमी दराने कच्च्या तेलाची विक्री करत आहे. भारतीय रिफायनिंग कंपन्यांनी मे महिन्यात सुमारे 25 दशलक्ष बॅरल रशियन कच्चं तेल खरेदी केलं आहे. भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी हे 16 टक्के आहे.

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार आहे. मे महिन्यात भारताने सर्वात जास्त कच्चे तेल इराकमधून आयात केले. स्वस्त कच्च्या तेलामुळे भारतीच्या सरकारी आणि खाजगी रिफायनरी रशियाकडे वळल्या, कारण जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सतत वाढत आहेत. अमेरिका आणि चीननंतर भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल ग्राहक देश आहे.

रशियन तेल भारतासाठी महाग

भारताला रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करणे महागात पडत आहे, कारण त्याला शिपिंग आणि विमा खर्चाच्या रूपात मोठी रक्कम मोजावी लागते. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे शिपिंग विमा खर्च झपाट्याने वाढलाय. यासोबतच कच्च्या तेलाचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनीही मार्जिन कॉस्ट वाढवली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा