रिलायन्स दिवाळीत उघडणार जगातील पहिले अनोखे थिएटर; जाणून घ्या खासियत

मुंबई, 3 नोव्हेंबर 2021: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज या दिवाळीत काहीतरी अनोखे करणार आहे. कंपनी मुंबईतील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये जगातील पहिले रूफटॉप ड्राईव्ह-इन थिएटर उघडणार आहे.

5 नोव्हेंबरला सुरू होणार हे थिएटर

रिलायन्स इंडस्ट्रीजचे हे थिएटर 5 नोव्हेंबरला उघडणार आहे. एका शॉपिंग मॉलच्या छतावर बांधलेल्या ओपन-एअर थिएटरमध्ये शहरातील सर्वात मोठा चित्रपट स्क्रीन असेल, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

कोरोनाच्या कालावधीनंतर लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कंपनीने असे थिएटर सुरू करण्याची योजना आखली आहे. या थिएटरमध्ये लोकांना स्वतःच्या कारच्या सुरक्षित वातावरणात सिनेमाचा खरा अनुभव घेता येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे.

290 कार पार्क करता येतील

कंपनीचे म्हणणे आहे की हे थिएटर इतके मोठे आहे की येथे एकावेळी 290 कार पार्क केल्या जाऊ शकतात आणि लोक त्यात चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकतात. ओपन एअर थिएटरमध्ये आधुनिक आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना सिनेमाचा मूळ अनुभव मिळेल.

कोरोनाच्या काळात लोकांच्या जीवनशैलीत अनेक बदल झाले आहेत. या काळात चित्रपटगृहेही बराच काळ बंद राहिली आणि तरीही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोजकेच लोक सिनेमागृहांकडे वळत आहेत. अशा परिस्थितीत, आपल्या कारमध्ये बसून चित्रपट पाहण्याचा अनुभव लोकांना सुरक्षिततेची भावना देईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा