रिलायन्सचा नफा तिसर्‍या तिमाहीत १२.५ टक्क्यांनी वाढून १३,१०१ कोटींवर

मुंबई, २३ जानेवारी २०२१: रिलायन्स इंडस्ट्रीजने (आरआयएल) शुक्रवारी डिसेंबरच्या तिमाहीचा निकाल जाहीर केला. तिसर्‍या तिमाहीत कंपनीचा एकत्रित नफा वार्षिक आधारावर १२.५ टक्क्यांनी वाढून १३,१०१ कोटी रुपये झाला आहे. विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा कंपनीचा नफा जास्त होता. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा कंपनीने निकाल जाहीर केला.

मार्केट कॅपिटलायझेशनद्वारे आरआयएल ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे.
डिसेंबरच्या तिमाहीत रिलायन्स इंडियाचे एकत्रित महसूल (कंसॉलिडेटेड रेवेन्यू) वर्षाकाठी २१.१० टक्क्यांनी घसरून १.२ लाख कोटी रुपयांवर आला आहे. कंपनीच्या महसुलात होणारी घसरण कंपनीच्या रिफाइनिंग व्यवसायाशी संबंधित अडचणींमुळे झाली.

आरआयएलचा नफा ११,४२० कोटी रुपये होईल, अशी विश्लेषकांची अपेक्षा होती. कंपनीचा महसूल १.२७ लाख कोटी अपेक्षित होता. रिफायनिंग व पेट्रोकेमिकल व्यवसायातून मिळणारा महसूल ८३,८३८ कोटी रुपयांवर आला. २०१९ च्या डिसेंबर तिमाहीत ते १.१९ लाख कोटी रुपये होते. या व्यवसायाचा कंपनीच्या उत्पन्नात दोन तृतियांश वाटा आहे.

आरआयएलच्या रिफाइनिंग व्यवसायावर कोरोना विषाणू साथीचा परिणाम झाला आहे. या साथीमुळे इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात खाली आली आहे. कंपनीच्या रिफाइनिंग व्यवसायात इंधनाचा मोठा वाटा आहे. डिजिटल सर्व्हिसच्या व्यवसायातून मिळकत २३,६७८ कोटी रुपयांवर गेली. २०१९ च्या डिसेंबर तिमाहीत ती १७,८४९ कोटी रुपये होती.

रिलायन्स रिटेल व्हेंचरची विक्री घटून ३६,८८७ कोटी रुपयांवर गेली. डिसेंबरच्या तिमाहीत ती ४५,३४८ कोटी रुपये होती. कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनचा परिणाम कंपनीच्या रिटेल व्यवसायावर झाला.
आरआयएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणाले की, “देशाच्या अर्थव्यवस्थेत चांगली प्रगती होत असताना, तिसर्‍या तिमाहीत चांगली कामगिरी करून रिलायन्स यात योगदान देत आहे याचा आम्हाला आनंद आहे. डिसेंबरच्या तिमाहीत आम्ही मजबूत निकाल दिला आहे. रिटेल विभागात मोठी रीकव्हरी झाली. आमच्या डिजिटल सेवा व्यवसायातही चांगली वाढ दिसून आली. ” अंबानी म्हणाले की, २०२० मार्चपासून रिलायन्सने आणखी ५०,००० लोकांना नोकर्‍या दिल्या आहेत याचा मला अभिमान आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा