आजच्या १११ कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्याने बारामतीकरांना दिलासा

बारामती, ४ ऑक्टोबर २०२०: काल दि. 3 ऑक्टोबर रोजी २७९ रूग्णांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते. यामध्ये 111 रूग्णांचे अहवाल प्रतिक्षेत होते. मात्र ते सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

बारामती तालुक्यातील १११ रूग्णांचे अहवाल प्रतिक्षेत होते त्यामुळे प्रशासनापासुन ते नागरीकांपर्यंत चिंतेचा प्रश्र्न उपस्थित झाला होता. मात्र आज रविवार दि. ४ सर्व रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी सांगितले आहे. तर हा बारामती तालुक्यासाठी चांगला निकाल असल्याचे उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे यांनी सांगितले. बारामती शहरात ऑक्टोबर १ , २, ३, तारखेच्या रूग्णांची माहिती घेतली असता अनुक्रमे १८ ,२५ , आणि २१ अशी नोंद दाखवित आहे. तर तीच ग्रामीण भागात अनुक्रमे ३१,४२ आणि ३६ अशी आहे.

ग्रामीण भागात आजही युवक मास्क न लावता सर्रास फिरताना दिसत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोना शहरात आहे ग्रामीण भागात नाही. मात्र शहरापेक्षा ग्रामीण भागाची आकडेवारी पाहिल्यास कोरोना नक्की कुठे जास्त आहे हे लक्षात येईल. कोणीही निष्काळजीपणे सार्वजनिक ठिकाणी वावरू नये. आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींसाठी मास्क ,सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स्‌चा वापर करावा असे आवाहन शासनाकडून वारंवार केले जात आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा