पीक विमा भरण्यास शेतकऱ्यांना दिलासा.

उस्मानाबाद, २७ जुलै २०२०:उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावे हे पीक विमा भरण्यासाठी पोर्टलवर दिसत नव्हती. शेतकऱ्यांच्या तक्रारी येत असल्या कारणाने खासदार ओमराजे निंबाळकर यांनी वेळोवेळी संबंधित अधिकारी यांच्या आढावा, बैठका घेतल्या. आणि ती गावे पोर्टल वर घेण्याच्या सूचना देखील केल्या. या पाठपुराव्याने कळंब तालुक्यातील पिंपळगाव डोळा, तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी, उमरगा तालुक्यातील अनंतपुर (बेरडवाडी), लोहारा तालुक्यातील कास्ती (खु), कास्ती (बु) पोर्टलवर दिसत आहेत. आता पीक विमा भरण्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. यावेळी घेण्यात आलेला प्रत्येक आढावा बैठकीत कळंब- उस्मानाबादचे आ. कैलास घाडगे -पाटील, जिल्हा कृषी अधिक्षक उमेश घाडगे, पिक विमा कंपनीचे संबंधित अधिकारी आदी उपस्थित होते.

यासोबतच, आणखीन काही शेतकऱ्यांची नावे ७/१२ उतारा पोर्टलवर दिसत नाहीत असे लक्षात आले. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावेत. याशिवाय त्यांचे पिक विमा ऑफलाईन भरण्या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा चालू आहे, असे देखील खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा