मुंबई, २३ सप्टेंबर २०२३ : आमदार अपात्रतेच्या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास देवेंद्र फडणवीस किंव्हा अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, असा तर्क लावला जात आहे. मात्र असे झाल्यास त्याचा फटका भाजपला बसू शकतो, असा इशारा प्रहार पक्षाचे प्रमुख व आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लवकर निर्णय द्यावा लागणार आहे. अशावेळी जर एकनाथ शिंदे हेच अपात्र ठरले तर त्यांना मुख्यमंत्रीपद सोडणे भाग पडणार आहे. अशावेळी मुख्यमंत्रीपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार येऊ शकतात. मात्र शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू यांनी या प्लॅन बीचा भाजपला मोठा फटका असेल, असा इशारा दिला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर