पुणे, दि.२जून २०२० : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि भारतीय सीमेवर वाढत चाललेल्या चीनच्या हालचाली यामुळे सर्वजण अस्वस्थ झाले आहेत. त्यानंतर “रंचो” ने सुरू केलेल्या “चायना हटाव” अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळत आहे त्यातच आता स्मार्टफोनमधून चीनी अप ओळखून त्यांना रिमूव्ह करण्याचे “रिमूव्ह चायना अँप” या भारताने विकसित केलेल्या अँप ची सध्या क्रेझ वाढताना पहायला मिळत आहे.
१७ मे रोजी लॉन्च झालेल्या या अँपला आतापर्यंत ११ लाखानहून अधिक नागरिकांनी आपल्या मोबाइलमध्ये वापरणे सुरू केले आहे. याबाबत एका सर्व्हेमध्ये असे सांगण्यात आले आहे की, कोरोना आपत्तीला चीनच जबाबदार असल्याचे ७० टक्के भारतीयांनी म्हटले होते. त्यातूनच अनेक भारतीय आता चिनी उत्पादने आणि चिनी अॅप्सना पर्याय शोधत आहेत. याशिवाय टिक टॉक हे अॅप रिमूव्ह करून आता “मित्रोंअॅप” ही ५० लाखांहून अनेकांनी डाऊनलोड केले आहे.
या अॅप बाबत दावा केला आहे की, हे अॅप शैक्षणिक उद्दिष्टांसाठी विकसित केले आहे. हे अॅप स्मार्टफोनमधील अॅप्स कुठल्या देशांचे आहेत, याची ओळख पटवून देते. विशेषतः अॅपच्या नावाप्रमाणे चिनी कंपन्यांनी विकसित केलेल्या अॅप्सची ओळख पटवून देते आणि यूजर्सची इच्छा असेल तर चिनी अॅप्स अनइन्स्टॉलही करते. १७ मे रोजी गुगल प्ले स्टोअरवर आल्यानंतर केवळ १४ दिवसांतच ११ लाखांहून अधिक लोकांनी हे मोफत अॅप डाऊनलोड केले आहे. याशिवाय गुगल प्ले स्टोअरवर त्याला ४.८ पॉझिटिव्ह रेटिंगही मिळाले आहे. या अॅपला लॉगिनची गरज नाही. वनटच अॅप लॅबद्वारे हे अॅप विकसित केले गेले आहे. ही कंपनी जयपूरची आहे. हे भारताने विकसित केले आहे. त्यामुळे त्याची क्रेझ वाढताना दिसत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर