शाळांमधून स्मार्ट-फोन हद्दपार करा, UNESCO च्या अहवालातून जगातील देशांना सल्ला

नवी दिल्ली, २८ जुलै २०२३ : आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलांचं भविष्य घडत आहे. डिजिटल प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोठी भर पडत आहे. युनोस्कोने मात्र याचा विपरित परिणाम विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संवादावर होत असल्याचं मत नोंदवलं आहे. त्यामुळे शाळांमधून स्मार्ट फोन हद्दपार करण्याचा सल्ला संयुक्त राष्ट्रांच्या शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक संस्था असलेल्या ‘युनेस्को नव्या अहवालातून जगभरातल्या देशांना दिला आहे. युनेस्कोच्या ‘ग्लोबल एज्युकेशन मॉनिटिरग रिपोर्ट’ या अहवालात मुलांकडून लहान वयापासून होत असलेल्या स्मार्टफोन वापरावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

युनोस्कोने आपल्या अहवालात लिहिले आहे की, डिजिटल शिक्षणात अफाट क्षमता असली तरी ते शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील प्रत्यक्ष संवादाची जागा घेऊ शकत नाही. कोणतेही तंत्रज्ञान शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील प्रत्यक्ष संवादाची जागा डिजिटल तंत्रज्ञान कधीच घेऊ शकत नाही. शिक्षण मानव केंद्रित असायला हवं. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कोणत्याही प्रकारच्या डिजिटल तंत्रज्ञानाकडे शिक्षणातील सहाय्यक घटक म्हणून पाहायला पाहिजे.

डिजिटल शिक्षणाचा फायदा आहे. मात्र, त्यामुळे शिकताना वर्गामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवादामध्ये येणारा व्यत्यय टाळण्यासाठी आणि सायबर गुन्ह्यांपासून विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यासाठी शाळांमधून स्मार्टफोन आणि मोबाईलवर बंदी आणली पाहिजे, असं आवाहन युनेस्कोने या अहवालात जगातील देशांना केल आहे. स्मार्टफोन किंवा मोबाईलच्या अतिवापराचे थेट परिणाम शैक्षणिक कामगिरी वर होत असल्याने शैक्षणिक कामगिरी खालवल्याचही या अहवालात म्हटलं आहे.

युनेस्कोने या अहवालात केलेल्या आवाहनाचे अनेक देशातून आता स्वागत होताना दिसत आहे. युनेस्कोच्या या अहवालाचे शिक्षण क्षेत्र आणि शिक्षण तज्ज्ञांनी स्वागत केलं आहे. स्मार्टफोन किंवा डिजिटल एज्युकेशन आणि विद्यार्थी शिक्षक संवाद यातून सुवर्ण मध्य काढला पाहिजे, असंही शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा