अनावश्यक केस असे काढा…..

पुणे, २७ जानेवारी २०२१: स्त्रियांच्या ओठांच्यावर आणि हनुवटीवर काही प्रमाणात केस असतात. हे केस शरीरातील हार्मोन्सच्या असंतुलनामुळे ओठांवर येत असतात. चेहऱ्यावर अनावश्यक केस असल्यास त्यामुळे सौंदर्य कमी होते. हे अनावश्यक केस काढण्यास दरवेळी पार्लरला जाणे परवडत नाही. म्हणूनच आज आपण चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी असलेल्या घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत.

हे उपाय करा….

लिंबू साखर….

चेहऱ्यावरील अनावश्यक केस घालविण्यासाठी दोन चमचे लिंबाचा रस घ्या, त्यामध्ये दोन चमचे साखर आणि एक चमचा मध मिसळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण गरम करून गार झाल्यावर चेहऱ्यावर ज्याठिकाणी अनावश्यक केस आहेत तेथे लावा. काही वेळानंतर मऊ कापडाच्या सहाय्याने पुसून घ्या. जर तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोन वेळेस केलात तर अनावश्यक केस निघून जातील.

केळी ओट्स मॅश….

चेहऱ्यावरील अनावश्यक केस घालवण्यासाठी दुसरा घरगुती उपाय म्हणजे केळी आणि ओट्सपासून बनवलेला स्क्रब. यासाठी एक पिकेलेलं केळ घेऊन त्यामध्ये दोन ते तीन चमचे ओट्स घाला. केळी मॅश करून घ्या. याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर कमीत कमी १५ ते २० मिनिटे तशीच ठेवा. हा उपाय केल्याने अनावश्यक केस निघून जातील.

गहू, बेसन दुध…

चेहऱ्यावरील अनावश्यक केस घालवण्यासाठी गव्हाचे पीठ आणि बेसन पीठ एकत्र करुन त्यामध्ये दुध मिसळा. हे मिश्रण आपल्या ओठांच्यावर लावा सुकल्यावर हाताने चोळून काढा. असे केल्याने अनावश्यक केस काढून टाकण्यास मदत मिळते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखील जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा