सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी जीवन संपवले, चित्रपटसृष्टीवर शोककळा

मुंबई, २ ऑगस्ट २०२३ : सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतःचे जीवन संपवले आहे. कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी स्वतःचे आयुष्य संपवले आहे. नितीन देसाई यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. नितीन देसाई यांच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याविषयी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

नितीन देसाई यांनी काही पत्र लिहिले आहे की नाही याची चौकशी पोलिस करत आहेत. ही कलाविश्वातील अत्यंत धक्कादायक बातमी आहे. कलाविश्वातील या दिग्गज व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

कर्जत येथील नितीन देसाई यांनी स्वतः उभारलेल्या एन.डी. स्टुडिओमध्ये शेवटचा श्वास घेतला आहे. नितीन देसाई यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे चित्रपट सृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कलाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. १९८७ पासून त्यांनी चित्रपट कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर नितीन देसाई यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा