नवी दिल्ली, दि. २२ मे २०२०: आज दहा वाजता रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गवर्नर शक्तिकांता दास यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. कोरोनाव्हायरसमुळे अर्थव्यवस्थेला बसलेला फटका आणि त्यामुळे आलेली मंदी यासाठी त्यांनी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. केवळ भारतच नव्हे तर पूर्ण जगामध्ये अर्थव्यवस्था ढासळलेली आहे. सर्व उद्योग धंदे जवळपास बंद झाले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडा जागेवर थांबला गेला आहे. नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी वीस लाख कोटी रुपयांची मदत पॅकेज जाहीर केले होते. यामुळे अर्थव्यवस्था सुरळीत होण्यासाठी फायदा होणार आहे . त्याच पार्श्वभूमीवर आज शक्तीकांत दास यांनी पुन्हा प्रेस कॉन्फरन्स घेत नवीन सवलती जाहीर केल्या आहेत.
आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दर कपात करण्याची घोषणा केली आहे. या कपातीनंतर आरबीआयचा रेपो दर ४.४० टक्क्यांवरून खाली ४ टक्क्यांवर आला आहे. यासह कर्जाच्या हप्त्यावर ३ महिन्यांची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. याचा अर्थ असा की आपण पुढील ३ महिन्यांपर्यंत आपल्या कर्जाची ईएमआय न दिल्यास बँक दबाव आणणार नाही.
▫️रेपो दरात ०.४०% कपात
आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, गेल्या तीन दिवसांत एमपीसीने देशांतर्गत व जागतिक वातावरणाचा आढावा घेतला. यानंतर रेपो दरात ०.४० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये ही दुसरी वेळ आहे जेव्हा आरबीआयने रेपो दरावर कात्री वापरली आहे. यापूर्वी २७ मार्च रोजी आरबीआयच्या गव्हर्नरने ०.७५ टक्के कपात करण्याची घोषणा केली होती. यावेळी बँकांनी कर्जावरील व्याज दर कमी केले होते. हे उघड आहे की यामुळे, पूर्वीच्या तुलनेत आपला ईएमआय देखील कमी झाला आहे.
▫️शक्तिकांता दास यांनी दिलेल्या सवलती :
• २०२०-२१ मध्ये पहिल्या सहामाहीत भारताची जीडीपी वाढ नकारात्मक होईल. तथापि, वर्षाच्या दुसऱ्या भागात काही प्रमाणात वाढ होऊ शकते.
• रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही
• लॉकडाउनपासून आर्थिक उलाढाली मध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान, तसेच देशातील मोठ्या औद्योगिक राज्यांमध्ये रेडझोन असल्याने मोठे नुकसान.
• मार्चमध्ये भांडवली वस्तूंच्या उत्पादनात ३६% घट झाली
• ग्राहक टिकाऊ वस्तूंमध्ये ३३% घट
• मार्चमध्ये औद्योगिक उत्पादनात १७ टक्के घट
• उत्पादनात २१ टक्के घट
मुख्य उद्योगांच्या उत्पादनात ६.५% घट.
• खरीप पेरणीत ४४ टक्के वाढ झाली आहे
• अन्नधान्य चलनवाढीचा दर एप्रिलमध्ये पुन्हा वाढून ८.६ टक्के झाला
• पुढील महिन्यात डाळींची महागाई विशेष चिंतेची बाब असेल
• या सहामाहीत महागाई उच्च राहील, परंतु पुढच्या सहामाहीत ते मध्यम होऊ शकेल.
• २०२०-२१ मध्ये भारताच्या परकीय चलन साठ्यात ९.२ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. भारताचा परकीय चलन साठा सध्या ४८७ अब्ज डॉलर्स आहे.
• एक्झिम बँकेला १५,००० कोटी क्रेडिट लाइन दिली जाईल
• सिडबीला दिलेली रक्कम पुढील ९० दिवस वापरण्याची परवानगी.
न्यूज अनकट प्रतिनिधी