सरीसृप- भारतीय अंडीखाऊ साप (Indian Eggeater Snake)

भारतीय अंडीखाऊ साप हा नामशेष झाला असे समजले जायचे, परंतु गेल्या काही काळात हा साप देशभरात विविध ठिकाणी तसेच महाराष्ट्रात वर्धा, यवतमाळ, अमरावती, जळगांव इथे सापडला. त्यामुळे या सापाविषयी थोडीफार माहिती उपलब्ध झाली आहे. याच शास्त्रीय नाव Elachistodon Westermannis आहे.

हा साप काहीसा तस्कर या सापासारखा दिसतो. या सापाच्या तोंडाची रचना अंडे खाल्ल्यावर तोंडातल्या तोंडात फोडून त्यातील द्रवपदार्थ पोटात गिळतो व अंड्यांचे कवच तोंडातून बाहेर फेकून देतो. याच वैशिष्ट्यामुळे या सापाचे नाव भारतीय अंडीखाऊ साप हे पडले.

भारतीय अंडीखाऊ साप हा लांबीला दोन ते अडीच फूट असतो. याच्या डोक्यापासून शेपटीपर्यंत पांढरी रेषा, पोट पांढरे, त्यावर बारीक काळे ठिपके असतात. हा साप मुख्यतः झाडावर तसेच जमिनीवरपण राहात असल्याने त्याचे शरीर सडपातळ असते. हा साप जमीन व झाडावर सहज वावरतो. जमीन व झाडावर पक्ष्यांची घरटी शोधून त्यातील पक्षी व अंडी खातो. अंडी हे त्याचे आवडते खाद्य आहे. या सापाची मादी ५ ते ८ अंडी देते.

पक्ष्यांची अंडी खाऊनच आपले पोट भरणारा हा साप वन्यजीव संरक्षण सूचित ‘अ’ श्रेणीत असून, संकटग्रस्त नामशेष होण्याच्या प्रजातीत याचा समवेश आहे. अतिशय दुर्मिळ असलेल्या या सापाच्या बद्दल फारशी माह‌िती उपलब्ध नाहीए. भारतीय अंडी खाऊ सापाची एकच जात भारतात सापडते.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा